हडपसर : गुंगीच्या ओैषधाचा स्प्रे मारुन तरुणीवर मैत्रिणीच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात रविवारी (ता.९) घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तीन नराधमांना अटक केली आहे.
राकेश सतीश आढाव (वय ३२, रा. विमाननगर), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन आणि मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन (दोघे रा. ओैरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या मैत्रिणीने रविवारी (रा.९) पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी सायंकाळी होती. मैत्रिणीने तिचे मित्र राकेश, मोहम्मद यांना सदनिकेत पार्टीसाठी बोलावले होते.
पिडीत तरुणी मैत्रिणीच्या घरी दुपारच्या सुमारास गेली होती. तेव्हा मैत्रिणीचे वरील तीनही मित्र आले होते. तेव्हा पिडीत तरुणी दुसऱ्या खोलीत दुपारी तीनच्या सुमारास आराम करण्यासाठी गेली. तेव्हा आरोपींनी झोपेत असलेल्या पिडीत तरुणीच्या चेहऱ्यावर गुंगी येणाऱ्या ओैषधाचा फवारा मारला आहे. आरोपींनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. दोन तासानंतर पिडीत तरुणी शुद्धीवर आली. तेव्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पिडीत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली
दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, कोंढवा पोलिसांनी आरोपी राकेश आढाव, मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन आणि मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन सर्फउद्दीन यांना बेड्या ठोकल्या आहे. तरी, पुढील तपास पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील करीत आहेत.