राहुलकुमार अवचट
यवत – पुणे-सोलापूर महामार्गावरील बोरीभडक (ता. दौंड) गावचे हद्दीतील नक्षत्र लॉजवर वेश्याव्यवसाय चालत असलेल्या वेश्याव्यवसायावर काल बुधवारी (ता.१२) छापा टाकून पर्दापाश करायला पुणे ग्रामीण विशेष पथकाला यश आले आहे. पोलिसांनी ४ मुलींची सुटका करून लॉज मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
किर्तिश सुधाकर हेगडे (शेट्टी) (वय ३६ वर्षे रा.बोरीभडक, चंदनवाडी ता.दौंड जि.पुणे.मुळ रा.मिनगुंडी कंपाउंड, उडपी, कर्नाटक) आणि रुपेश किसन झुनगारे (वय ३३ वर्षे रा.सांगवी ता.भोर जि.पुणे ) आणि लॉजचा मालक किशोर ज्ञानेश्वर आतकिरे ( रा.बोरीभडक ता.दौंड जि.पुणे) व त्यांचे आणखीन ३ साथीदार यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे (ए.एच.टी.यु.) पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी ए.एच.टी.यु. विभागा विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या आहे.
सदर पथकाला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासुर्डी टोलनाका येथील नक्षत्र लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती १२ ऑक्टोबर २०२२ रोजी एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने बनावट ग्राहक तयार करून पर्दापाश केला. पोलिसांनी या कारवाईत ४ मुलींची सुटका करून लॉजचा मालकासह सहा जणांवर यावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत किर्तिश हेगडे आणि रुपेश झुनगारे याला अटक केली आहे. तर सदर वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहे काय? याबाबत पुढील अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
हि कारवाई पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, निर्मला ओव्हाळ यांच्या पथकाने केली आहे.