अहमदनगर : अहमदनगर नवासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहे. अशातच आता अहमदनगर जिल्ह्याला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या नावावरून चर्चाना पूर्णविराम मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा ठराव महापालिकत मंजूर करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेला बहुमत ठरावाची मागणी करण्यात आली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” झाल्याची घोषणा केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती निमित्त एकनाथ शिंदे बोलत होते, त्यावेळी ही घोषणा केली होती. महापालिकेसह रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस यांचेही ना हरकत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासखात्याकडे सुपूर्त करण्यात आलं आहे.
मे महिन्यात आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर नामकरणाला गती आल्याचं दिसत आहे.