धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे निरीक्षक श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी चाचपणी केली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 9 उमेदवार इच्छुक आहेत. विद्यमान खासदार सुभाष भामरे, माजी सनदी अधिकारी प्रतापराव दिघावकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे, भाजपाच्या पदाधिकारी माधुरी बाफना, डॉक्टर विलास बच्छाव, जिल्हा परिषदेच सदस्य हर्षवर्धन दहिते, बिंदू माधव हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत.