कोल्हापूर : जिल्ह्यातील वरणगे पाडळी येथील कृष्णात पाटील यांचा मुंबईमध्ये एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी कोल्हापूरला घेऊन आले. मात्र, अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेल्यानंतर कृष्णात पाटील यांच्याऐवजी दुसऱ्याच वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अदलाबदलीमुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे बदललेला मृतदेह पुन्हा मुंबईला नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली.