नवी दिल्ली: मॅकडोनाल्डसारखी प्रसिद्ध फूड चेन असलेल्या ‘बर्गर सिंग’ची (Burger Singh) वेबसाईट पाकिस्तानी सायबर हल्लेखोरांनी हॅक केली आहे. Team Insane PK असे हॅकर्सचे नाव आहे. हॅकर्सनी भारतीयांना पाकिस्तानी सायबर स्पेसपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. बातमी लिहेपर्यंत https://www.burgersinghonline.com/ नावाची वेबसाइट सुरू नव्हती आणि त्यावर पाकिस्तानी हवाई दलाचा प्रचार करणारा संदेश दिसत होता.
बर्गर सिंगकडून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही वेबसाईट हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी मंगळवारीच ‘बर्गर सिंग’ला (Burger Singh) टार्गेट करून वेबसाइटवर संदेश प्रसारित केला होता. वेबसाईट हॅक करण्यासोबतच हॅकर्सनी भारतीय वायुसेनेशी संबंधित अभिनंदन यांचे कार्टूनही पोस्ट केले आहे आणि लिहिले आहे – टी इज फैन्टेसटिक’.
दरम्यान काही वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी भारतीय लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. त्यांनी पाकिस्तानचे F-16 हे लढाऊ विमान पाडले होते. त्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडले, पण भारताच्या दबावामुळे त्यांना परत सोडावे लागले.
मात्र, बर्गर सिंगची वेबसाईट हॅक करताना पाकिस्तानी हॅकर्सनी लिहिले आहे, की पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात केलेल्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देत PAF ला आज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देशाचे रक्षण करण्याच्या कर्तव्याची आम्हाला जाणीव आहे. हॅकर्सनी भारतीयांना सांगितले आहे की, ते त्यांचे सर्व्हर धरून आहेत. तळाशी पाकिस्तान झिंदाबाद असे लिहिले आहे.
URGENT ADVISORY: Pakistani group hacks Burger Singh website ???? pic.twitter.com/2fmmJwCnf8
— Burger Singh (@BurgerSinghs) February 27, 2024
दरम्यान बर्गर सिंगने आपल्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, हे डिजिटल आउटेज कमी कालावधीचे आहे. कंपनीला लवकरच या घटनेवर मार्ग निघेल असा विश्वास आहे. कंपनीच्या सोशल मीडिया पोस्ट् पाहता, पाकिस्तानी हॅकर्सच्या कृतीबद्तीदल अजिबात काळजीत आहे असे वाटत नाही.