वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या सोबतच वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे देखील वाहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या ७२ तासात कोकण व्यतिरिक्त राज्याच्या संपूर्ण भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच-सात दिवसात कोकणामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या एक दोन जिल्ह्यांमध्ये अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर दिवशी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ७२ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड याबाबत मेघगर्जना व विजांच्या कडकडे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये २६ व २७ तारखेला मेघ गर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारपीट होण्याची शक्यता आहे. २८ व २९ तारखेला विजांचा कडकडाट व तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या खान्देश भागातील नाशिक नगर जळगांव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे.