लडाख: केंद्रशासित प्रदेश लडाखच्या कारगिल जिल्ह्यात सोमवारी (19 फेब्रुवारी) रात्री 21:35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस 148 किलोमीटर अंतरावर होता.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोणत्याही नुकसानीबाबत तात्काळ माहिती दिलेली नाही. रविवारी रात्रीपासून लडाखमध्ये अधूनमधून बर्फवृष्टी होत आहे. स्थानिक मीडियानुसार, श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
माडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गसह काही भागात 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
Earthquake of Magnitude:5.2, Occurred on 19-02-2024, 21:35:17 IST, Lat: 35.45 & Long: 74.93, Depth: 10 Km ,Location: 148km NW of Kargil, Laddakh, India for more information Download the BhooKamp App https://t.co/MFGkLzM4Lu@KirenRijiju @Dr_Mishra1966 @Indiametdept @ndmaindia pic.twitter.com/iZnl7HCS97
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 19, 2024