मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू इम्रान ताहिरने वयाच्या 44 व्या वर्षी एक मोठी कामगिरी केली आहे. इमरान ताहिर टी-20 फॉरमॅटमध्ये 500 विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. अलीकडेच इम्रान ताहिरने दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. इम्रान ताहिर हा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. विशेषत: इम्रान ताहिर हा त्याच्या वयामुळे चर्चेचा विषय राहिला आहे. ज्या वयात इम्रान ताहिरने हे यश संपादन केले ते कौतुकास्पद असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे.
इम्रान ताहिरची कारकीर्द
20 कसोटी सामन्यांबरोबर इम्रान ताहिरने 107 एकदिवसीय आणि 38 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय इम्रान ताहिरने आयपीएलचे 59 सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त इम्रान ताहिर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. आयपीएलच्या 51 सामन्यांमध्ये इम्रान ताहिरने 20.77 च्या सरासरीने आणि 7.76 च्या इकॉनॉमीने 82 बळी घेतले आहेत. इम्रान ताहिरची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 12 धावांत 4 बळी.
या गोलंदाजांचे टी-20 फॉरमॅटमध्ये वर्चस्व
वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा टी-20 फॉरमॅटमध्ये 500 बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. यानंतर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कॅरेबियन गोलंदाज सुनील नरेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर आता या यादीत इम्रान ताहिरचे नाव जोडले गेले आहे. ड्वेन ब्राव्होच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये 624 विकेट्स आहेत. अफगाणिस्तानच्या राशिद खानने टी-20 फॉरमॅटमध्ये 556 विकेट घेतल्या आहेत. तर सुनील नरेनने टी-20 फॉरमॅटमध्ये 532 विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले.