उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका कुटुंबाने हुंड्याच्या मोहापायी समलैंगिक मुलाचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान मुलगा वैवाहिक सुख देत नाही म्हणून महिलेने तिच्या सासरच्या कुटुंबियांकडे तक्रार केली. तेव्हा तिच्या सासरच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. तेव्हा नवऱ्यानं रडत रडत पत्नीकडे घटस्फोट मागितला.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकरण उघड पडल. मुलगा समलैंगिक असल्याची माहिती कुटुंबियांना आधीपासून होती. मात्र हुंडा मिळावा, यासाठी त्याचा विवाह जबरदस्तीने लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाचा मामा अमृतलाल, सासरा सुरेंद्र कुमार जायस्वाल, सासू ज्ञानवती, जेठ मुकेश जायस्वाल,पती मनीष विरोधात वैवाहितेचा छळ आणि हुंडा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खागा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील महिलेचा विवाह मनीष कुमार नावाच्या मुलाशी झाला होता. नव्या संसाराची स्वप्न घेऊन ही महिला सासरी आली. मात्र तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत नव्हता. तिला वैवाहिक सुख देत नसल्यानं महिला माहेरी निघून गेली. यानंतर तिने सर्व हकीकत माहेरच्यांना सांगितली. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिची मनधरणी करत तिला पुन्हा सासरच्या लोकांसोबत सासरी पाठवलं.
प्रवास करत असताना सासरच्या लोकांनी पुन्हा या महिलेला मारहाण केली. हा सर्व प्रकार तिने तिच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर नवऱ्याने रडत रडत त्याने तिच्याकडे घटस्फोट मागितला. मी गे आहे, हुंड्यासाठी माझ्या घरच्यानी लग्न लावून दिलं आहे, तुझी फसवणूक केली अशी कबुली त्याने दिली. नवऱ्याचे बोलणं ऐकून वैवाहितेला धक्काच बसला.