पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं आणि तिच्यावर स्वत:च्या कारमध्येच बलात्कार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. हा प्रकार जून २०२१ ते सप्टेंबर २०२३ आणि गुरुवारी ८ फेब्रुवारीला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाघोली येथे घडला. या प्रकरणी तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन गौरव पांडूरंग बोराटे या २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात. या ओळखीतून मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं. जर भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी त्याने मुलीला देऊन भेटायला बोलवलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसायला सांगितलं आणि कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच आरोपीेने याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देत वडिलांना शिवीगाळ केली. आरोपी वारंवार धमकी देत असल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत जाऊन तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.