युनूस तांबोळी
शिरूर : आपल्या आई-वडिलांचा कायम सांभाळ करण्याची महिलांची तळमळ दाखविणारा ‘अधिकार’ हा लघुपट डॉ. सुषमा तायडे यांच्या संकल्पनेतून व “निर्मिती मीडिया सोल्युशन्स प्रोडक्शन”च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. महिलांना विवाह झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी सासरी ज्या यातना, कष्ट भोगावे लागतात, हे दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन देविदास झुरुंगे यांनी केले आहे. यासाठी संकल्पना अनिल जमदाडे व डॉ. सुषमा तायडे यांची आहे. मेघश्याम कोल्हे, रत्नाकर शेट्टी, शंकर आल्हाट, प्रकाश देशमुख यांनी निर्मिती केली आहे. यासाठी अजय साळवे व मारूती भूमकर, रमाकांत सुतार यांचे सहकार्य लाभले आहे.
या लघुपटात नितल शितोळे, अमोल डोळे, श्रीकृष्ण भिंगारे, अल्पना देशमुख, शशिकांत माने या कलाकारांनी प्रमुख भूमिका पार पडल्या असून, छायाचित्रण हर्षल जाधव यांनी केले आहे. संकलन आणि पार्शवसंगीत प्रीतम तुंगे यांनी केले आहे. हा लघुपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.