राजस्थान : राजस्थान येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ ते २० महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सभापती महेंद्र मेवाडा, आयुक्त महेंद्र चौधरी आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत ८ एफआयआर दाखल केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलांवर बलात्कार करून त्यांचा अश्लिल व्हिडिओ शुट केला आणि व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील सिरोही येथील नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्तांनी त्यांच्या ८ ते १० साथीदारांसोबत बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडितांनी सिरोही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचा बहाणा करून नोकरीसाठी बोलावून घेत त्यांचे शोषण केले जात होते. तसेच त्यांचे अश्लिल व्हिडिओ शुट करून व्हायरल करण्याच्या धमक्या देखील दिल्या जात होत्या आहे. एका ठिकाणी बोलावून महिलांना जेवणाची व्यवस्था करून ठेवायचे.
जेवणात गुंगीचं औषध देऊन बलात्कार
जेवणात आमली पदार्थ किंवा गुंगीचे औषध असल्याने महिला बेशुध्द व्हायाच्या, या नंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे. महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त झाले होते. दरम्यान, महिलांना त्यांच्यासोबत काय घडले याची कल्पना आली होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांचे व्हिडीओ काढून पाच पाच लाख रुपये मागितले जात होते. नाहीतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. पोलीस या प्रकरणाचा तापास वेगाने करत आहेत.