पुणे : प्रेमात दुरावा निर्माण झाल्याच्या रागात प्रियकराने प्रेयसीला दारु पिऊन शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित तरूणीने प्रियकराविरूद्ध तक्रार दाखल केली असून येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, पुढील शिक्षणासाठी प्रेयसी पुण्यात आली. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. याच रागातून आशिषने तरुणीला दारु पिवून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच रिलेशनमध्ये राहिली नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवले. हा प्रकार येरवडा परिसरातील शास्त्री नगर येथे सह्याद्री हॉस्पिटलच्या समोर शुक्रवारी (दि.9) आठच्या सुमारास घडला आहे. आशिष कोलते (वय-30 रा. क्रांतीनगर, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर आयपीसी 354ड, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुळची छत्रपती संभाजीनगर येथील आहे. सह्याद्री हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम पाहते. पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले होते. मात्र, मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. तरुणीला त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा नसताना त्याने बोलण्याचा प्रयत्न करुन तिचा पाठलाग पीडित तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे.