पुणे : पुणे शहरातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात उड्डाणपूल आणि मेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. या पार्शवभूमीवर शनिवारपासून पुढील आदेश होईपर्यंत परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी काढले आहेत. दरम्यान, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी औंध रोडवरून औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसरामधील शिवाजीनगरकडे येणारी आणि शिवाजीनगरकडून औध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खालीलप्रमाणे बदल केलेल्या मार्गाचा अवलंब करावा.
असे आहेत बदल?
- शिवाजीनगरकडून गणेशखिंड रोडने औंध, सांगवी, पिपरी चिंचवड, हिजवडी कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी एबिल हाऊस येथून उजवीकडे वळण घेऊन सरळ रेंजहिल्स, सिफनी चौक मार्गे साई चौक खडकी, डॉ. आंबेडकर चौक बोपोडी सरळ स्पायसर चौक मार्गे ब्रेमेन चौकातुन इच्छित स्थळी जावे
- औध गावाकडून शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळण घेऊन सरळ स्पायसर जंक्शन, डॉ. अआंबेडकर चौक, साई चौक खडकी, रेंजहिल्स चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
- एबिल हाऊस चौकामध्ये रेंजहिल्सकडून येवून उजवीकडे वळण घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहील.
- गणेशखिंड स्त्यावरील सगंणा धोत्रे पथ जाणे-येणेस दुहेरी मार्ग सुरु राहील.
- गणेशखिंड रस्त्यावरील खाऊ गल्ली मार्गे ओम सुपर मार्केट सर्कलकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे.
- सिम्बायोसिस कॉलेजकडून खाऊ गल्लीतून गणेशखिंड खेडवर येण्यास बंदी राहील.