पुणे : भाजपकडून पुण्यात निखील वागळेंची गाडी फोडण्यात आली. गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल पुण्यात भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. त्याशिवाय निखील वागळे यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप कार्यकर्त्यांकडून निखील वागळेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेक करण्यात आली तेव्हा निखील वागळेंच्या कारची मागची काच फुटली. तेव्हा गाडीत निखील वागळे होते. सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. आत्तापर्यंत निखील वागळेवर 6 हल्ले झाले आहेत. आज त्यांच्यावर 7वा हल्ला झाल्याचे निखील वागळेंनी म्हटले.
निर्भय बनो कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या आधीच अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. हा कार्यक्रम उधळून लाऊ अस पुणे शहर भाजपने जाहीर केले होते. तर भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास महाविकास आघाडीकडून कार्यक्रमास सुरक्षा पुरवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यासाठी कॉंग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले. यात आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले.