मुंबई : मुंबईत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःलाही कार्यालयात गोळी घालून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे माही मिळत आहेत. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिसचे काम होते.