पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या निसर्गात अनेक फळे-भाज्या आहेत. त्याचे फायदेही बरेचसे असतात. पण काहींना याची माहिती नसते. त्यापैकी एक म्हणजे बीट. बीट हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय, पचनक्रियाही सुधारण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेची समस्या जाणवत असेल तर तुम्ही या फळाचा आहारात समावेश करू शकता. बीटमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. जे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. काही लोक या फळाचा रस पितात किंवा भाज्यांमध्ये घालून खातात. यात अनेक जीवनसत्त्वे असतात, जी शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमसह इतर अनेक पोषक घटक असतात. याच्या वापराने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
बीटमध्ये फोलेट आणि फायबर असून, ते त्वचेसाठी फायदेशीर असतात. यासाठी तुम्ही बीटरूटचा रस चेहऱ्यावर लावू शकता. तसेच पचनक्रिया सुधारण्यासही फायदेशीर ठरते. जर आपल्याला बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या असेल तर आपण नियमितपणे बीटरूटचा रस पिऊ शकता. यामुळे अन्न पचण्यास मदत होते.