नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (7 फेब्रुवारी) संजय सिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला. हायकोर्टाने 31 जानेवारीला संजय सिंगच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
याआधी आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांना 5 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला होता. कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.