मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सर्वच स्तरातून वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. यात आता मराठी कलाकारांनीही आपली प्रतिक्रीया देण्यास सुरूवात केली आहे. नुकतच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्विटच्या माध्यमातून अजित पवार गटाला गटाला चिन्ह आणि पक्ष मिळाल्यासंदर्भात मच व्यक्त केलं.
जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे, असं तेजस्विनी पंडितने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये तेजस्विनी पंडितने कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे तिने केलेल्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे आहे? हे स्पष्ट नाही झालं. नेटकऱ्यांनी तेजस्विनीच्या ट्विटचा रोख हा अजित पवारांवर असल्याचे त्यांच्या कमेंटमधून म्हटले आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागल्याने अजित पवारांसाठी आनंदी-आनंद आहे. याआधी संसदेत जेव्हा विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं, त्यावेळी सुद्धा तेजस्विनीने केलेलं ट्विट व्हायरल झालं होतं. चला बिलं पास करून घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासूनच होती आता तर विरोध करायला कोणी नाही. लोकशाहीच बसली धाब्यावर… हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास, असं ट्विट तेजस्विनी पंडितने केलं होतं.