पुणे : सुनेत्रा पवार आज वाघोली दौरा करणार आहेत. मंगळवारी (दि. 6 जानेवारी) रोजी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आले. यानंतर आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादीचा संपर्क वाढवण्यासाठी, पक्ष बळकटीसाठी सुनेत्रा पवार वाघेलीत महिलांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
यावेळी त्या स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांचे प्रश्न, अडचणींची विचारपूस करूण त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या करतील. महिला वर्गाशी संपर्क वाढवण्यासाठी सुनेत्रा पवार यांची ही नवी रणनिती असल्याचे सांगितले जात आहे. वाघेली दौऱ्यात त्यांच्यासोबत पार्थ पवारदेखील असणार आहेत.
याआधी अजित पवार यांनी शिरूर मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचं चॅलेंज दिलं होतं. कोणताही उमेदवार उभा करेन पण निवडून आणेल! असं चॅलेंज अजित पवारांनी शरद पवारांना दिलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत. त्यातच काल राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने सगळेच नव्या जोमाने कामाला लागल्याच पहायला मिळत आहे.
वाघोलीत भेटीगाठी
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके आणि माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवास यांनी सदिच्छा भेट दिली. संक्रातीनंतर होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. या भागातील विविध कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजर राहत आहेत.