रांची: झारखंडमध्ये मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने सोमवारी (५ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राज्याच्या 81 सदस्यीय विधानसभेत 47 आमदारांनी प्रस्तावाच्या बाजूने तर 29 आमदारांनी विरोधात मतदान केले. अपक्ष आमदार सरयू रॉय यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.
यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की द्वेषाचा पराभव होईल. राहुल गांधी आणि कल्पना सोरेन यांचा फोटो शेअर करताना काँग्रेसने लिहिले की, “आज कल्पना सोरेन यांनी झारखंडमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली. आपण सर्व संघटित होऊन न्यायाचा लढा सुरू ठेवू आणि जनतेचा आवाज बुलंद करू.
तर राहुल गांधी यांनी रांचीमध्ये सांगितले की, आम्ही भारत जोडो न्याय यात्रेत न्याय हा शब्द समाविष्ट केला आहे. हे देशात चांगलेच समजले जात आहे. तुमच्यावर अन्याय केला जात आहे आणि म्हणूनच तुम्ही ते चांगल्या प्रकारे समजून घेत आहात.
हेमंत सोरेन यांना अटक
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर, झारखंडच्या विधीमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठराव प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली.
2 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडीत पाठवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सोमवारी झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून पुन्हा सुरुवात झाली. राज्यातील प्रवासाचा आज चौथा दिवस आहे.
आज झारखंड में श्री @RahulGandhi से श्रीमती कल्पना सोरेन जी ने मुलाकात की।
हम सभी एकजुट होकर न्याय की लड़ाई जारी रखेंगे, जनता की आवाज बुलंद करेंगे।
नफरत हारेगी, जीतेगा INDIA ???????? pic.twitter.com/wA0ZQjlFXX
— Congress (@INCIndia) February 5, 2024