मुंबई : मराठा आरक्षणावरुन महायुतीत मराठा आणि ओबीसी असे २ गट पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नेते मराठा आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत, तर ओबीसी नेते, छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत. ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ सातत्याने करत आहेत.
अशातच आता छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटवर दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या भाजपाकडून छगन भुजबळ यांना प्रमोट केलं जात आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
भुजबळ भाजपच्या वाटेवर? एकेकाळी छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप. अंजली दमानिया यांनी गुरुवारी रात्री केलेल्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024