कोल्हापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू असताना एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आणि गावच्या स्थानिक राजकारणातून घर जमीन दोस्त झाल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे.
कुटुंबातील एकाने हातात तेलाचा डब्बा घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तेलाचा डब्बा हातातून काढून घेत सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी कुटुंबाचा आक्रोश आणि दोन लहान मुलांची रडतानाचे चित्र हे अत्यंत क्लेशदायी होते. सकाळी १० ते १२ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही घटना घडली. कसबा सांगाव येथील सागर पुजारी यांनी आई, पत्नी आणि दोन लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि तेलाचा डबा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले आणि अचानक घोषणाबाजी करत आत्मदहनाचा प्रयत्न करू लागले. त्यांचे घर आठ महिन्यापूर्वी गावच्या स्थानिक राजकारणातून अतिक्रमणात असल्याचे सांगून पाडण्यात आले. केलेली करवाई चुकीची असल्याचा करत पुजारी यांनी केला. तर घर पाडल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. त्याठिकाणी अन्य अतिक्रमणाला हात न लावता केवळ आमचेच घर पाडण्यात आले असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. तहसीलदार शिल्पा ठोकरे यांच्यावर ही ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीपुजारी कुटुंबिय करत आहे.