मध्य प्रदेश: ग्वालेरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सध्या पाठवले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. शनिवारी संध्याकाळपासून हे कुटुंब दिसले नसल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
रविवारी सकाळी कुटुंबातील सर्वांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. जितेंद्र झा त्रिवेणी झा आणि अचल झा अशी मृतांची नावे आहेत. ते हुरावली परिसरात राहत होते. तिघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिघांनी मिळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जितेंद्र हे व्यवसायाने मजूर होते. त्यांचे घर दोन दिवस बंद होते. रविवारी सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूचे लोक हैराण झाले होते. यानंतर त्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपासात केला. पोलिसांनी मृतांचे मोबाईल जप्त केले आहेत. सध्या या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.
घटनास्थळी मृत वडिलांनी लिहीलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात, “एका विशिष्ट व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली आहे. आता मीही आत्महत्या करणार आहे”. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.