पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांमुळे रविवारी २८ जानेवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा दरम्यानच्या अनेक उपनगरी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे.
हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल कृपया सहकार्य करावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मेगा ब्लॉकमुळे या गाड्या रद्द
१) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
२) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल राहील.
३) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
४) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
५) पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
६) शिवाजीनगर वरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
७) लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
८) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
९) तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
१०) लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
११) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
१२) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
उशिराने धावणाऱ्या रेल्वे गाड्या
एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे.