पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत सराईत गुन्हेगारांकडून तीन गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी 24 जानेवारीला आळंदी येथील कोळगाव रोड परिसरात करण्यात आली. विरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय 30 रा. केळगाव, आळंदी), राहूल बसवराज सर्जन (वय 30 रा. भोसरी) व अमोल फिलीप साळवी (वय 30 रा. आळंदी रोड, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुमित देवकर आणि गणेश सावंत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी विरभद्र हा बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगत आहे. त्यानंतर पोलिसांनी विरभद्र याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. यावेळी त्याच्याकडून 1 लोंखडी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसे जप्त केली.
याबरोबरच पोलिसांनी राहुल सर्जन आणि अमोल साळवी यांना देखील ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून दोन लोंखडी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपींविरोधात आळंदी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अमंलदार गणेश सावंत, सुमीत देवकर, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, विनोद वीर, महेश खांडे, प्रवीण माने, सागर शेंडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, पोलीस हवालदार माळी व पोलीस शिपाई हुलगे यांनी केली.