हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते आणि केस गळती होते. केसगळती रोखण्यासाठी काही उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस कोरडी होतात. ज्यामुळे केस गळू शकतात. केसगळती रोखण्यासाठी कापूराचे तेल ही महत्त्वाचे आहे.
कोंड्याची समस्या जास्त का होते?
सुंदर केस केवळ चांगले दिसत नाहीत तर आपले सौंदर्य देखील वाढवतात. परंतु काही वेळा बदलत्या हवामानामुळे किंवा चुकीच्या सौंदर्य उत्पादनांच्या निवडीमुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या सुरू होते. विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा आपण खूप गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा ते आपल्या त्वचेपासून तेल काढून घेते. त्यामुळे स्कीन कोरडी होऊ लागते. मग ते खपल्याचे रूप घेते आणि कधीकधी केस गळणे देखील सुरू होते.
कापूरापासून केसांचे तेल बनवा
कोंड्याच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, जो तुम्हाला कोंडा होण्यापासून मदत करेल. यासाठी 2-3 भीमसेनी कापूर चांगले बारीक करून घ्या, नंतर एका भांड्यात टाका, अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. नंतर त्यात सुमारे एक कप गरम खोबरेल तेल घाला आणि आठवड्यातून तीन दिवस 45 मिनिटे केसांना लावा. नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
तेल कसे कार्य करते?
वास्तविक, भीमसेनी कापूरमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. तसेच, त्याचे शीतकरण गुणधर्म डोक्याला थंडपणा देऊन चिडचिड कमी करण्यास मदत करतात. जेव्हा आपण ते आपल्या केसांना लावतो तेव्हा ते केसांना फायदेशीर ठरते आणि केसांच्या वाढीस मदत देखील करते. त्याच वेळी, त्याच्या अम्लीय गुणधर्मांमुळे, लिंबाचा रस डोक्याची पीएच पातळी संतूलित ठेवून बुरशीची वाढ रोखण्याचे कार्य करते. त्यामुळे ते बनवणे सोपेच नाही तर परिणामकारकही आहे.