पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रोजच्या पेक्षा आज मु्ंबईच्या बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात वाहतूकी परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहनांची गती प्रचंड मंदावली आहे. मराठा आरक्षणासाठी आलेले बांधव आपापल्या गावी परतत असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे.
मराठा आंदोलक घरी परतून जात आहे. त्यातच आठवड्याचा शेवट असल्याने सुद्धा द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. सध्या वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेतला जात आहे.
मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात आहे. या ब्लॉकद्वारे महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील २-३ तासात ही वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.