लातूर : शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वलांडी गावातून उघड झाली आहे. अल्ताफ कुरेशी याने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने तिच्या आईला याची माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अत्याचारग्रस्त मुलीच्या वडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले होते.
घटनेती माहिती होताच मुलीच्या नातेवाईकांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी देवणी पोलिसात भारतीय दंड संहिता, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून कलम 376 ए.बी. 376 (2) 377, 506 अनुसूचित जाती जमाती 1989 नुसार 3 (1) डब्लू (1), 3 (2), 3 बालकांचे लैगिंक अपराध संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अल्ताफ कुरेशीला अटक केली आहे.
गावकऱ्यांचा तीन तास रास्तारोको
शुक्रवारी सकाळी झेंडावंदनानंतर वलांडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील रस्त्यावर तीन तास रास्ता रोको करण्यात आला. आजूबाजूच्या गावातील नागरिकही वलांडीत दाखल झाले होते. संध्याकाळी वलांडी भागातील महिला वर्गांनी एकत्रित येत कॅन्डल मार्च काढला. या घटनेतील दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.