Maratha reservation: मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आत्तापर्यंत आपण ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेल्या आहेत. जरांगे पाटील आता सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. आणखी देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप होत आहेत ५० लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांशी सवांद साधला यावेळी त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकार मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय जारी करण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, प्रशासकीय अधिकारी सुमंत भांगे, आणि काही मंत्री सहभागी झाले होते.
यावेळी ओबीसी समाजाला आरक्षणाअंतर्गत मिळत असलेल्या सवलती मराठा समाजाला देण्याबाबतचा शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील पदयात्रा मुंबईच्या वेशीवरच थांबावी, मुंबईत दाखल होऊ नये यासाठी सरकारचा हा शेवटचा प्रयत्न असेल.
बैठकीत नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी चर्चा झाल्यानंतर ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.