पुणे : पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक पिटबुल जातीचा कुत्रा एका व्यक्तीच्या अंगावर सोडत धर याला चव असं म्हणत अंगावर सोडलं. या कुत्र्याने एका व्यक्तीला दोन ठिकाणी चावा घेतला. याप्रकरणी कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मेरूकर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित मल्लाप्पा शिंगे यांनी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश मेरुकर यांनी पाळलेला पिटबुल जातीचा कुत्रा साखळी न लावता त्याला फिरण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं होतं. यावर फिर्यादी यांनी कुत्र्याला साखळी लाव तो कोणाला तरी चावेल असं सांगितलं. दरम्यान आपल्याला सांगितल्याचा राग आल्याने गणेश मेरुकर याने फिर्यादी तरुणाला शिवीगाळ केली.
फिर्यादीचा हात पिरघळून त्याने त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याला “धर याला, चाव, छू…” असं सांगितलं. त्यानंतर त्यानंतर कुत्रा फिर्यादीचे अंगावर धावून जात त्यांना उजव्या मांडीला दोन जागेवर चावा घेतला. यामध्ये फिर्यादी जखमी झाली असून त्यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निकाळजे अधिक तपास करत आहेत.