पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज २३ जानेवारीला हायवे ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईच्या मार्गावर २४.२५० आणि पुणे मार्गावर ५६.९०० किलोमीटर (कुसगाव वाडी) येथे गंन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ ते २ दरम्यान वाहतूक वळविण्यात आली आहे.
- पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे.
- पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस खोपोली एक्झिट किलोमीटर ३९.८०० यथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडंग टोलनाकामार्गे मुंबईच्या मार्गावर जातील.
- पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड़-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किलोमीटर ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या रस्त्यावर मार्गस्थ होतील.
- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या सागांवरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील.
- मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामागांवरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल.