पुणे : पुणे शहर आणि परिसरात गारठा पुन्हा वाढला आहे. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुण्यात किमान तापमानाचा पारा १२.१ अंश सेल्सिअस इतका नोंदला गेला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. २२ जानेवारीला मध्य प्रदेशातील दातीया येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १६ जानेवारीला ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सोमवारी निफाड येथे ८.८, तर जळगाव येथे नऊ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांदरम्यान आहे. राज्याच्या किमान तपमानात घट होत गारठा वाढण्याची शक्यता आहे.
२४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान
पुणे १२.१, धुळे ६.३, जळगाव ९.०, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १३.५, नाशिक ११.६, निफाड ८.८, सांगली १७.७, सातारा १४.५, सोलापूर १७.६, सांताक्रूझ १२.६, डहाणू १६.५, रत्नागिरी १७.८, छत्रपती संभाजीनगर ११.५, नांदेड १६.६, परभणी १४.८. अकोला १२.८, अमरावती १४.३, बुलडाणा १२.४, ब्रह्मपुरी १७.१, चंद्रपूर १६, गडचिरोली १४.२, गोंदिया १२.९, नागपूर १४.४, वर्धा १५.५, वाशीम १२.४, यवतमाळ १५