Job Aler: पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे लेखा सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी बारावी पास, चार्टर्ड अकाउंटंट, खर्च लेखापाल असणे गरजेचे आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. लेखा सहाय्यक या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, यासाठी 25 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यात 25 वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवाराला 22,500 ते 27,500 पर्यंत पगार मिळू शकणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.shipindia.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.