Heart Attack in Kids : उत्तर प्रदेशातील एक ५ वर्षाची चिमुकली आईजवळ बेडवर बसून मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात घडली आहे. महेश खडगवंशी यांची पत्नी सोनिया शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अंथरुणावर बसल्या होत्या. त्यांची ५ वर्षांची मुलगी कामिनी त्यांचा मोबाईल घेऊन कार्टून बागात बसली होती.
नेमक काय घडल?
हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या आई वडिलांसह राहत होती. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची पाच वर्षांची मुलगी कामिनी अंथरुणावर बसली असताना तिने आईचा मोबाईल घेतला अन् कार्टून बघण्यास सुरूवात केली.
अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो जमिनीवर पडला. मात्र, बाजूला बसलेल्यांना वाटलं की मोबाईल मुद्दामहून पाडला आहे. मात्र, मुलीला अस्वस्थ अवस्थेत पाहिल्यावर आई-वडिलांन धक्काच बसला. मुलीला काहीतरी झाल्याचं पाहून शेजारचे नागरिक धावत आले. मुलीला तातडीने डॉक्टरांना दाखवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं.
कामिनीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला
मुलीचं नाव कामिनी आहे. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचा पाचवा वाढदिवस ३० जानेवारीला साजरा होणार होता. कामिनीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आमची एकुलती एक मुलगी पूर्णपणे निरोगी होती, असं कुटूंबियांनी सांगितलं आहे. मुलीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? यावर पोलिस अधिक चौकशी करत आहेत.