मुंबई : ठाण्यातील ऐरावलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐरावली येथील एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्यूशन क्लाससाठी घरातून बाहेर पडली. मात्र, ती ट्यूशनला न जाता शेजारच्या एका बागेत जावून बसली होती. तिच्या आईने तिला बागेत बसलेलं पाहून आईने मुलीला मोठ्याने आवाज दिला. तेव्हा त्या मुलीने आपल्या आईला बघून बागेतून पळून गेली आणि पुन्हा ती परतलीच नाही सध्या तिचा शोध घेतला जातोय.
दरम्यान, आई मुलीला बराच वेळ फोन आणि तिचा शोध घेत राहिली. मात्र, तिने तेथून पळ काढला होता. त्यामुळे तिचा मुलीशी काही संपर्क होऊ शकला नाही. मुलगी सापडली नाही, म्हणून तिच्या पालकांनी अखेर रबाळे पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला आहे. मात्र, सध्या तिच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. ट्यूशन सेंटरमधूनही याबाबत माहिती घेतली असता, त्यांची मुलगी अनेक दिवस क्लासला येत नसल्याची माहिती त्यांनी दिली नाही, सध्या या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.