बंगळुरू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहितने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहितने चिन्नास्वामी स्टेडीयमवर चौकार आणि षटकार लगावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. त्याने विराट कोहलीला मागे सोडले.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर आहे. गिलने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 126 धावा केल्या होत्या, तर ऋतुराज गायकवाड नाबाद 123 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 122 धावा आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित 121 नाबाद धावांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.