MLA Disqualification Case :मुंबई : सुप्रीम कोर्टाने दिलेली चौकट मोडून विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणााचा निकाल दिला असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी म्हटले. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याची गंभीर दखल घेईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अध्यक्षांन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. तर, भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड वैध ठरवली. तर, आमदार अपात्र प्रकरणात कोणतेही आमदार अपात्र ठरवले नाहीत. हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेणार नाही, असे त्यांना वाटलं असेल. पण कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे कोर्ट याची गांभीर्याने दखल घेईल असेही अनिल परब म्हटले. लवाद हा कोर्टापेक्षा मोठा नसतो असेही त्यांनी म्हटले.
भाजपकडून रडीचा डाव सुरू असल्याची टीका विश्वास परब यांनी केली. आता पक्षाला निवडणूक चिन्ह मिळू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह आहे. त्यावर समता पक्षाने पुन्हा एकदा दावा केला आहे. भाजपच्या कटकारस्थानाविरोधात आम्ही कायम संघर्ष करणार असल्याचे अनिल परबांनी म्हटले.