नवी दिल्ली : लोकसभा 2024 निवडणुकीसाठी भाजपकडून खास रणनिती तयार करण्यात आली आहे. देशातला सर्वात मोठा पक्ष असल्यानं अनेक जबाबदाऱ्या असतात. अनेक काम असतात, ती योग्य रितीने पार पाडायची असतात. त्यासाठी वेगवेगळ्या कामांचं विभाजन करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंग होतं, त्यासाठी भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचं संयोजकपद विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
त्यामुळे आता दुसऱ्या पक्षातून भाजपात येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे. आयारामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. समितीचे संयोजक विनोद तावडेंना केलं आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाचे नेता भाजप पक्ष जॉईन करेल.
समितीमध्ये आठ जण कोण ?
दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत आठ जणांची समिती अंतिम निर्णय घेणार आहे. आठ जणांमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीया यांचा समावेश आहे. तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याची आज घोषणा केली.