पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला.
दरम्यान गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती आता समोर आली आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला.
दरम्यान कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.” असंही फडणवीस म्हणाले,