मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष एकीकडे शिवसेना आमदार पात्र आणि अपात्रेबाबत निकाल तयार करणार आहे. तर लगेच दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत सुनावणी सुरु करणार आहेत.
शिवसेना आमदार अपात्रेबाबतचा निर्णय अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत द्यायचा आहे. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले होते. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितला. तर दुसरीकडे शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिसीला उत्तर सादर केले आहे.
नोटीसीमध्ये पक्षांतराच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद सदस्य नियम 1986 अंतर्गत आपलं म्हणणं लेखी स्वरुपात सात दिवसात देण्याचे उपसभापती यांनी विधानसभा परिषद सदस्यांना निर्देश दिले होते.