नवी दिल्ली: सोशल मीडियाच्या जमान्यात जग खूपच लहान होत चालले आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडणारी एखादी घटना आपल्यापर्यंत अगदी कमी वेळात पोहोचते आणि व्हायरल होऊ लागते. एक काळ असा होता जेव्हा आपण फक्त कथांमध्ये ऐकायचो की मृत्यूनंतर व्यक्ती अंतिम संस्कारापूर्वीच पुन्हा जिवंत होते. आता अशीच एक घटना लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. वयोवृद्ध आजोबा मृत्यूला चकवा देत पुन्हा जिवंत झाले. कुटुंबीय त्यांना स्मशानभूमीत घेऊन जाण्याच्या तयारीत होते, पण त्याआधीच ते जिवंत झाले.
हा व्हिडीओ कुठला आणि कधी चित्रित करण्यात आला? याबाबत सोशल मीडियावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो आश्चर्यचकित झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की वृद्धाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक जमा झाले आहेत. प्रत्येकजण अंत्यसंस्काराशी संबंधित विधी करत होते. ते मृतदेह उचलून चार जणांच्या खांद्यावर स्मशानभूमीत घेऊन जाणार असताना वृद्धाच्या काही हालचाल झाली.
तेथे उपस्थित काही लोक विधी कॅमेऱ्यात कैद करत होते. त्यामुळे त्यांच्या शरीरात हालचाल होताच या घटनेची नोंद करण्यात आली. वयोवृद्ध आजोबांनी डोळे मिचकावले. ते पाहून सर्वजण त्यांना थोडी हवा मिळावी म्हणून कपड्यातून बाहेर काढू लागले. यादरम्यान काही लोक ‘उघडा भाऊ, उघडा’ असे म्हणताना ऐकू आले. आता मोठ्या प्रमाणात लोक या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत आहेत. गिड्डे नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.