मुंबई : आपल्या निसर्गात अशी अनेक झाडे, वनस्पती आहेत त्याचे विशेष असे गुणधर्म असतात. त्याचे नैसर्गिकरित्या अनेक फायदेही आहेत. पालेभाज्या, फळे खाण्याला प्राधान्य दिले जाते. पण वनस्पतीबाबत बोलायचे झाल्यास गवती चहा देखील गुणकारी मानला जातो. गवती चहामध्ये अनेक गुणधर्म आहेत ज्याने फायदा होऊ शकतो.
वजन कमी करण्यास गवती चहा मदत करते. त्याचे सेवन केल्यास चयापचय वाढते. विशेष म्हणजे गवती चहाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. गवती चहाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हे हृदय निरोगी ठेवते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. हे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. लिंबू आणि गवती चहा घेण्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत. जे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण करते.
तसेच गवती चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. या चहाने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर होते. गवती चहामध्ये असलेल्या फॉलिक ॲसिड, तांबे, थायमिन, लोह, जस्त सारख्या पोषक तत्त्वांमुळे हा फायदा होतो. या पातींमध्ये अँटिऑक्सिडंट आणि औषधी गुणधर्म देखील आहेत.