Madhya Pradesh Accident : नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस पटली झाली आणि आग लागली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. तर 14 प्रवाशी जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हा प्रशासनला अपघातातील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याचे आदेश दिलेत. त्याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत देण्याची निर्देश दिले आहेत.अपघामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचारासाठी सर्व मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजलं, हे वृत्त वाचून दु:ख झालेय. या हृदय विदारक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि डंपरचा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झाला. गुना – आरोन महामार्गावर हा भीषण अपघात झाला. डंपर महामार्गावर उलट्या दिशेने येत होता.. त्यावेळी डंपने प्रवाशी बसला जोरदार धक्का दिला. म्हणून जोरगार अपङात झाला. डंपरची धडक बसल्यामुळे बस पलटी झाली. त्यानंतर बसचा भीषण आग लागली. या आगीमध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू झालाय.