Weather Update : मुंबई : सध्या राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला आहे. परंतू, राज्यात थंडी आणि धुक्यासह पावसाची रिमझिमही पाहायला मिळणार आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाअखेर आणि नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आयएमडीमे वर्तवली आहे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काश्मीर खोऱ्यात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पर्वतीय भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमानात घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.