Weather Update Today : देशात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळेस दाट धुके राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या भागात धुके पाहायला मिळेल. गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रासहित देशातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ ते १ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. आज तामिळनाडूच्या किनारपट्टी आणि आसपासच्या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील तामिळनाडूतील किनारपट्टीवर ३० डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासहित देशातील हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे.
29 डिसेंबरपासून वायव्य भारतावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर पदेशमधील काही भाग आणि दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.