Gautami Deshpande Wedding : अखेर गौतमी तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. गौतमीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. गौतमी देशपांडे ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीने काहीच दिवसांपुर्वी ती लग्न करणार असल्याची बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता होती.
गौतमीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने लग्न करणार असल्याची घोषणा केली. गौतमीने हे फोटो शेअर करताना लिहिलंय की, “माझ्या सिक्रेट सांताचं आगमन थोडं लवकर झालंय. खुप आनंद आणि प्रेम”, असं कॅप्शन देत गौतमीने ही खास बातमी शेअर केली होती. आता गौतमीचं लग्न झाल्याने सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
गौतमीचा नवरा काय करतो?
गौतमी देशपांडेने तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न केले आहे. स्वानंद हा एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. स्वानंद भाडिपा या प्रसिद्ध युट्यूब चॅनलमध्ये सक्रिय आहे. स्वानंद एक डिजीटल क्रिएटर असून त्याचे अनेक रिल्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमी -स्वानंदच्या चाहत्यांनी त्यांचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय.
अखेर आज गौतमी देशपांडे आणि स्वानंदचं लग्न झालंय. नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत गौतमीने लग्न केलंय. गौतमीच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. गौतमी – स्वानंदने लग्नात एकमेकांना मॅचिंग असे कपडे परिधान केलेत. ज्यात ते दोघेही खूप संदर दिसत आहेत. त्यांच्या खास मुंडावळ्यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय.