राजेंद्रकुमार शेळके
जुन्नर : चलनी नोटा व नाणे संग्राहक मोहम्मद शकील जाफरी यांना भावना सामाजिक संस्था आणि युनिटी शैक्षणिक, सामाजिक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा “राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार- २०२३” देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जाफरी हे गेल्या ३६ वर्षांपासून मंचर येथे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला आणि साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नाशिक येथील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या वेळी माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, निवृत्त पोलीस आधिकारी विनोद शांताराम अंबरकर, डॉ. बापूराव देसाई, युनिट सामाजिक संस्थेचे सचिव प्रा. वाजिद आली खान, युनिट सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जमील कुरैशी, भावना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहूल मोरे पाटील, भावना सामाजिक संस्थेचे सचिव महेश मुळे, अलका गायकवाड, एजाज सिद्दीकी, भाऊसाहेब बावा, कविता मेहंदळे, प्रा. लीला जंजीरे, अक्रम खान आणि मंजुषा दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुक्त पत्रकार, व्याख्याते, बहुभाषिक कवी असलेले शकील जाफरी हे १९८८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता यासारख्या अनेक विषयांवर जनजागृतीपर कार्य करीत आहेत.