Thane News : ठाण्यातील कासारवडवली या परिसरातून तिहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सर्वात आधी बायोकोच्या डोक्यात लाकडी बॅट मारून तिला संपवलं, नंतर पोटच्या गोळ्याला देखील सोडलं नाही. मुलगी आणि मुलाच्या डोक्यात बॅट मारून त्यांना देखील संपवलं. ही घटना ठाण्यातील कासारवडवली येथील एका चाळीत घडली आहे. अमित बागडी असं आरोपीचं नाव आहे. या प्रकारानंतर आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक चाळ आहे. या चाळीत छोटसं कुटुंब राहत होतं. फरक एवढाच होता की, नवरा-बायकोमध्ये भांडण झाले होते. त्यामुळं बायकोनं नवऱ्याला सोडलं आणि आपल्या मुलाबाळांसह भावासोबत ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला. कासारवडवली या परिसरात तिनं आपला संसार थाटला. या संकटाच्या काळात बहिणीच्या पाठीमागे तिचा भाऊ खंबीरपणे उभा होता. पण तिच्या नवऱ्याला हेच खटकलं. त्याला हे सगळं काही बगवत नव्हतं. तो भांबावून गेला आणि त्याच्या डोक्यात राग निर्माण झाला.
हाच राग डोक्याच ठेवून अमितनं एक प्लॅन आखला. दोघेही नवरा-बायको मूळचे हरियाणाचे आहेत. पण झालेल्या वादामुळे पत्नी ठाण्यात शिफ्ट झाली होती. रागाचा वचपा काढण्यासाठी अमित ठाण्यात आला. पण तो कोणत्या कारणानिमित्त आलाय, ते त्याच्या बायको आणि मुलांना माहिती नव्हतं. यावेळी अमितनं आपल्या बायको आणि मुलांना गाफिल ठेवलं आणि संधीचा फायदा घेत सर्वांना संपवलं.
क्रिकेटच्या लाकडी बॅटने तिघांना संपवलं
क्रिकेटची लाकडी बॅट घेऊन सर्वात आधी बायकोच्या डोक्यात घालून बायकोची हत्या केली नंतर पोटच्या गोळ्यालाही सोडलं नाही. मुलगी आणि मुलाच्या डोक्यावर बॅट मारली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अमित घाबरून आपल्या मूळ गावी हरियाणात जाऊन बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना चौकशीची सूत्र हलवली. त्यानंतर ३६ तासांमध्येच अमित बागडी या आरोपीला पोलिसांनी अटक केली.